१५/ ११/२०२१ ते २०/११/२०२१
Children week
" चिल्ड्रन्स वीक "
सर्व छोट्या मुलांचे लाडके ' पंडित जवाहरलाल नेहरु ' यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर रोजी असतो याचे औचित्य साधून आमच्या शाळेत "चिल्ड्रन्स वीक" साजरा करण्यात आला यामध्ये दिनांक १५/ ११/२०२१ ते २०/११/२०२१ यादरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यांमध्ये चित्रकला, निबंध ,गायन ,नृत्य ,वेशभूषा अशा स्पर्धेचा समावेश करण्यात आला. चित्रकले स्पर्धेत 'स्मरण चित्र' हा विषय तसेच निबंध स्पर्धेमध्ये 'माझा छंद' 'ऑफलाइन व ऑनलाइन' शाळेबद्दल तुमचे मत' असे विषय देऊन या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच वेशभूषा स्पर्धा गायन स्पर्धा यांमध्येही ठराविक विषय देऊन या स्पर्धा घेतल्या.
त्या सोबत 'गुरुनानक जयंती' निमित्ताने लंगर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या सर्व स्पर्धांमध्ये 'पूर्व प्राथमिक व प्राथमिक' विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आपला सहभाग नोंदविला. तसेच 'माध्यमिक' विद्यार्थ्यांनी ऑफलाईन म्हणजे शाळेमध्ये येऊन या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदविला. स्पर्धांमध्ये वेळोवेळी विद्यार्थ्यांना सर्व शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले व या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद दिला. या सर्व स्पर्धां मध्ये प्रत्येक स्तरावरील बक्षीस पात्र बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
एकंदरीत या सर्व स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीने पार पडल्या.
सौ. दिपीका गुळे. - लेखिका
JMF Sanskriti Vihar, Dr.Nemade Marg, Old Dombivli Road, Dombivli (W), Maharashtra - 421202
Jana Gana Mana Vidyamandir & Jr. College | Developed By Sanmisha Technologies