कुसुमाग्रजांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
28 फेब्रुवारीला जन गण मन विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे सर तसेच सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे मॅडम आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्यामला राव मॅडम उपस्थित होते.
त्यानंतर सरस्वती व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व दिप प्रज्वलन केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत झाले.
प्रथम विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले. त्यानंतर मान्यवरांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, पोवाडा, काव्यवाचन व भाषण सादर केले. त्यांनंतर मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन मराठी शिक्षकांचा सत्कार केला आणि शेवटी आभार प्रदर्शन झाले.
सूत्र संचालक - गायत्री टिचर ,प्राजक्ता टिचर
आभार प्रदर्शन - दिपीका टिचर
JMF Sanskriti Vihar, Dr.Nemade Marg, Old Dombivli Road, Dombivli (W), Maharashtra - 421202
Jana Gana Mana Vidyamandir & Jr. College | Developed By Sanmisha Technologies