आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी ठाणे भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थे मार्फत माहिती वर्गाचे आयोजन जन गण मन विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज डोंबिवली येथे करण्यात आले होते .
ठाणे जिल्हा भारत स्काऊटस् आणि गाईडस् चे जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री भाऊसाहेब कारेकर साहेब आणि जिल्हा आयुक्त गाईड सौ ललिता दहितुले मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेच्या परिक्षेत्रात येणा-या डोंबिवली विभागातील स्काऊटर आणि गाईडर यांच्यासाठी माहिती वर्गाचे व ऑनलाईन OYMS बाबतचे आयोजन आज दि. ३१ •७•२०२३ रोजी जन गण मन विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज डोंबिवली प. येथे सकाळी११.०० वा करण्यात आले या माहिती वर्गाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन करण्यात आली .त्यानंतर सामूहिक स्काऊट प्रार्थना व स्वागत गीत घेण्यात आले.या कार्यक्रमासाठी जानवी मल्टि फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा डॉ राजकुमार कोल्हे सर , जिल्हा संघटक आयुक्त स्काऊट किरण लहाने सर ,स्थानिक संस्था अध्यक्ष अशोक जगताप सर ,नरेंद्र राणे सर, लक्ष्मण धात्रक सर, डॉ मनीलाल शिंपी सर , संदीप भुसेंगे, स्थानिक संस्था सचिव जगदीश उगले ,इन्चार्ज प्रिन्सिपॉल अमोल वैद्य सर ,शिवाजी पारटे , स्काऊट मास्टर चंद्रकांत खैरनार सर , सुनील पाटील सर, सुनील भांगरे सर , गाईड कॅप्टन अनुराधा द्विवेदी ,प्रतिभा जाधव व इतर स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन उपस्थित होते.
दीप प्रज्वलनानंतर प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर जानवी मल्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजकुमार कोल्हे सरांनीउपस्थित स्कॉऊटर व गाईडर यांना मोलाचे मार्गदर्शन केले. *संस्थेच्या सचिव सौ प्रेरणा कोल्हे मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.माहिती वर्गासाठी प्रशिक्षक म्हणून श्री किरण लहाने सर ,श्री लक्ष्मण धात्रक सर ,श्री अशोक जगताप सर ,श्री नरेंद्र राणे सर ,श्री संदीप भुसे सर यांनी काम केले .डॉ मनिलाल शिंपी सरांनी उपस्थितांचे गाण्याच्या माध्यमातून मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोद वैद्य सरांनी केले व समारोप सचिव जगदीश उगले यांनी केला. माहिती वर्गाचे नियोजनासाठी गाईड कॅप्टन वैशाली शिंदे मॅडम व जन गण मन विद्यामंदिर चे इतर कर्मचारी यांनी मदत केली. या माहिती वर्गा साठी डोंबिवली परिसरातील प्रशिक्षित स्काऊटर आणि गाईडर .याशिवाय ज्या शाळेतील शिक्षकाचे प्रशिक्षण झाले नाही असे एकूण 50 स्काऊट मास्टर ,गाईड कॅप्टन उपस्थित होते.
4 वाजता माहिती वर्गाचा समारोप करण्यात आला.
श्री जगदीश उगले
सचिव,
डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था
JMF Sanskriti Vihar, Dr.Nemade Marg, Old Dombivli Road, Dombivli (W), Maharashtra - 421202
Jana Gana Mana Vidyamandir & Jr. College | Developed By Sanmisha Technologies